top of page

फिक्स्ड डिपॉजिटमध्ये पैसे गुंतविले ? नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या काय आहे नवीन नियम

सर्व सामान्यांपासून ते श्रीमंत लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून फिक्स्ड डिपॉजिटमध्ये (FD)कडे पाहतात. आणि FD मध्ये पैसे गुंतवतात. जर तुम्हीही फिक्स्ड डिपॉजिटमध्ये (FD) पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. एफडी करण्याआधी काही गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. रिझर्व बॅंकेने FD च्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

ree

त्यानुसार आता FD मॅच्योरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही परताव्याची रक्कम क्लेम केली नाही तर त्यावर मिळणारे व्याज कमी होऊ शकते. हे व्याज सेविंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजाइतके असेल. सर्वसाधारणपणे एफडीवर जवळपास ६ टक्क्यांच्या आसपास व्याज मिळते. तर सेविंग अकाऊंटवर व्याज दर 3 टक्क्यांच्या आसपास असते. त्यामुळे आता सर्वांना FD मॅच्योरिटी तारीख लक्षात ठेवावी लागणार आहे.

रिझर्व बॅंकेचा नवीन नियम काय आहे ?

तुम्ही जर एफडीमध्ये पैसे गुंतवले असतील आणि तिची मुदत आज संपणार असेल. तरीही तुम्ही पैसे काढण्यासाठी क्लेम केला नाही. तर अशा परिस्थितीत सेविंग अकाऊंटप्रमाणे व्याज मिळत राहिल. त्यामुळे एफडीची मुदत संपल्यास लगेच क्लेम करा अन्यथा तेथून पुढच्या कालावधीचे व्याज सेविंग अकाऊंटप्रमाणे सुरू होईल.


 
 
 

Comments


bottom of page