top of page

शेतकऱ्यांनो ७ सप्‍टेबर पर्यंत 'हे' काम करा; अन्यथा....

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ७ सप्‍टेबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक

नांदेड जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ६२८ लाभार्थ्‍यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया करणे बाकी

ree

नांदेड :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील लाभार्थ्‍यांनी सोमवार १२ सप्‍टेबर २०२२ रोजी वितरीत होणारा १४ वा हप्‍ता मिळण्‍याकरीता पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी बुधवार ७ सप्‍टेबर २०२२ पर्यंत पुर्ण करण्‍याबाबत शासनाने कळविले आहे.


केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील कालावधीचा लाभ मिळण्‍यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ज्‍या लाभार्थ्‍यांनी ई-केवायसी केली नाही, अशा लाभार्थ्‍यांचा पुढील लाभ थांबविला जाणार आहे.

ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया अतिशय सोपी असून ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्‍यासाठी खालील दोन पध्‍दतीने ई-केवायसी करता येईल. लाभार्भी स्‍वतः https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Corner या टॅबमध्ये किंवा PMKisan अँपद्वारे ओटीपीद्वारे मोफत करता येईल. (पुढील लिंकद्वारे Direct e-KYC टॅब ओपन होईल - https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx ) ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) येथे प्रति लाभार्थी १५ रुपये दराने ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल.

नांदेड जिल्‍हयातील १ लाख ४३ हजार ६२८ लाभार्थ्‍यांनी अद्याप ई-केवायसी न केल्‍याने योजनेचा पुढील कालावधीचा लाभ थांबविला जाणार आहे. ई-केवायसी न केलेल्‍यांचा तालुका निहाय तपशील पुढील प्रमाणे आहे. नांदेड ६ हजार १६५, अर्धापूर ४ हजार ४६४, कंधार १३ हजार ६५६, लोहा १४ हजार ६३७, बिलोली ७ हजार १७, नायगाव ९ हजार ४२२, देगलूर ९ हजार ७१७, मुखेड १२ हजार ८६७, भोकर ८ हजार ५६७, मुदखेड ५ हजार २५७, हदगाव १७ हजार १०१, हिमायतनगर ६ हजार २४३, धर्माबाद ४ हजार ७८४, उमरी ५ हजार ४७७, किनवट १५ हजार ७२३ तर माहूर ५ हजार ५२१ एवढ्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील ज्‍या लाभार्थ्‍यांनी ई-केवायसी अद्याप केलेली नाही, त्‍यांनी बुधवार ७ सप्‍टेबर २०२२ पुर्वी वरील दोन पद्धतीपैकी एका पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करून योजनेचा पुढील लाभ सुरळीत करून घेण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आवाहन केले आहे.


 
 
 

Comments


bottom of page