top of page

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; सहा महिलांचा होरपळून मृत्यू

एका फटाक्यांच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऊना (हिमाचल प्रदेश) जिल्ह्यातील हरोलीमधील टाहलीवाल येथील फटाक्यांच्या कारखान्यामध्ये हा स्फोट झालाय. या स्फोटामुळे कारखान्याला आग लागली आणि त्यामध्ये सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला तर १० हुन अधिक महिला जखमी झाल्या आहेत. जखमीना ऊना येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आज दुपारच्या सुमारास हा स्फोट झाला असून स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. मरण पावलेल्यांमध्ये एका तीन वर्षाच्या मुलीचाही समावेश असून कामगार असणाऱ्या आपल्या आईसोबत ही मुलगी कारखान्यात आलेली असं सांगण्यात येत आहे.

स्फोट झाला तेव्हा कारखान्यामध्ये ३० ते ३५ कर्मचारी काम करत असल्याची माहिती जखमींपैकी एका महिलेने दिली.


 
 
 

Comments


bottom of page