top of page

एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले; मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

पुणेः लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदूर- दौंड एक्सप्रेसचे दोन डबे घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडला. गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली आहे. दरम्यान, सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

इंदूर एक्सप्रेस सकाळी ७ वाजून ५७ वाजता मिनिटांनी लोणावळा रेल्वे स्थानकात दाखल होत होती. त्यावेळी मागचे दोन डबे (जनरल) रुळावरून घसरले. रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रूळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. या घटनेमुळं मुंबईहून- पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.


 
 
 

Comments


bottom of page