top of page

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम

इंग्लंडने नेदरलँड्सविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्या नोंदवून नवा विश्वविक्रम नोंदवला केला. अ‍ॅमस्टेल्विन येथे झालेल्या नेदरलँडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ५० ओव्हरमध्ये ४ बाद ४९८ धावा केल्या. या सामन्यात तब्बल २६ चौकार आणि ३६ षटकार ठोकले गेले. तर इंग्लंडच्या तिघांनी शतकं तर एकाने अर्धशतक झळकावलं. इंग्लंडने ४९८ धावा करत स्वतःचाच सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला.

ree

जॉस बटलरने ७० बॉलमध्ये नाबाद १६२ धावा केल्या त्यात ७ चौकार आणि १४ षटकारांचा समावेश होता. फिलिप सॉल्टने ९३ बॉलमध्ये १२२ आणि डेव्हिड मलानने १०९ बॉलमध्ये १२५ रनची खेळी केली. सॉल्टने १४ चौकार आणि ३ षटकार तर मलानने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनने २२ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकाराच्या साह्याने नाबाद ६६ धावा केल्या.

ree

एकदिवसीय सामन्यामधल्या सर्वोच्च धावसंख्येपैकी पहिल्या तिन्ही धावसंख्या आता इंग्लंडच्या नावावर आहेत. याआधी इंग्लंडने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४८१/६ तर २०१६ साली पाकिस्तानविरुद्ध ४४४/३ अशा धावा केल्या होत्या.


 
 
 

Comments


bottom of page