top of page

मोठा निर्णय! लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली

या वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला असून निवडणुकांमध्ये उमेदवारांना करता येणाऱ्या खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी रात्री उशीरा निवडणूक आयोगाने घोषणा केली.

ree

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, आता लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या राज्यांमधील उमेदवारांना ९० लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे. याआधी ही मर्यादा ७० लाख रुपये इतकी होती. तर छोट्या राज्यांमधील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ५४ लाखांवरून ७५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यासाठी खर्चाची किती मर्यादा आहे, हे देखील स्पष्ट केलं आहे.

लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांना करता येणाऱ्या खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी मोठ्या राज्यांमधील उमेदवारांना खर्चाची मर्यादा २८ लाखांवरून ४० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर लहान राज्यांसाठी ही मर्यादा २० लाखांवरून २८ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या नव्या निर्णयामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमधील उमेदवारांना आता वाढीव खर्च मर्यादेचा फायदा होऊ शकेल.


 
 
 

Comments


bottom of page