top of page

एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक

पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी)ने अटक केली आहे. गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

ree

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी जानेवारी महिन्यात एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आपण भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी यावेळी केला होता. गिरीश चौधरी मंगळवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या कागदपत्रांची ईडीकडून तपासणी करण्यात आली.


 
 
 

Comments


bottom of page