top of page

इगतपुरीत रेव्ह पार्टी: फिल्म इंडस्ट्रीतील ४ महिलांसह २२ जणांवर पोलिसांनी केली कारवाई

नाशिक : आज पहाटेच्या सुमारास मुंबईपासून जवळच असलेल्या इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात ड्रग्स आणि हुक्का सेवन करतांना 22 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या रेव्ह पार्टीत चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या चार महिलाही सहभागी झाल्याचं कारवाईनंतर स्पष्ट झालं. तसेच ‘बिग बॉस’ या शोमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. १० पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २२ जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं.

इगतपुरीमध्ये मानस रिसॉर्टच्या हद्दीत स्काय ताज विला या बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी ड्रग्ज आणि कॅश देखील जप्त केली असून अटक केलेल्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.



 
 
 

Comments


bottom of page