top of page

खाद्यतेलाच्या टँकरचा अपघात; तेल घेऊन जाण्यासाठी स्थानिकांची झुंबड

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाद्यतेल (गोड तेल) घेऊन जाणारा टँकरचा अपघात झाला आहे. पालघर तालुक्यात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर उलटल्यानंतर त्यामधून तेल गळती सुरू झाली.

ree

तेल रस्त्यालागत असलेल्या खड्ड्यामध्ये गोळा झाले. गळती होणारे तेल घेऊन जाण्यासाठी स्थानिकांनी घरातील भांडीकुंडी घेऊन अपघातग्रस्त ठिकाणी एकच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.




Comments


bottom of page