top of page

'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयावर ईडीची धाड; तब्बल ५.३२ कोटी रुपयांची रोकड जप्त

सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकले. खाण घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

ree

शुक्रवारी मिश्रा आणि त्यांच्याशी संबंधित काही जणांच्या मालमत्तांवर ईडीनं धाडी टाकल्या. १८ ठिकाणी छापे टाकत ईडीनं तब्बल ५.३२ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे, साहिबगंज जिल्ह्यातील बरहेट आणि राजमलमध्ये धाडी टाकण्यात आल्या. मिश्रा यांचे निकटवर्तीय असलेल्या हिरा भगत यांच्या घरावरदेखील छापा टाकण्यात आला. भगत यांच्या घरात ईडीला घबाड सापडलं. बराच वेळ पैशांची मोजदाद सुरू होती.




 
 
 

Comments


bottom of page