top of page

"या" राज्यात कधीही होऊ शकतो मोठा भूकंप, शास्त्रज्ञांनी दिला इशारा

टर्की आणि सीरीया देशात काही दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपात हजारो लोकांचा प्राण गेला असून, लाखो जण जखमी झाले आहेत. अशातच राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेने ( एनजीआरआय ) हिमाचल, उत्तराखंडसह नेपाळच्या पश्चिम भागात कधीही भूकंप होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. एनजीआरआयचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली विविध स्तर असतात, ज्यांची सतत हालचाल होत असते. भारतातील पृष्ठभागाखालील स्तर प्रतिवर्षी ५ सेटींमीटरने सरकत आहे. याने दबाव निर्माण होत असून, मोठा भूकंप होण्याची शक्यता असल्याचे एन. पूर्णचंद्र राव यांनी सांगितलं आहे, त्यापार्श्वभूमीवर आम्ही उत्तराखंडमध्ये १८ भूकंप केंद्रे स्थापन केली आहे,” अशी माहिती एन. पूर्णचंद्र राव यांनी दिली आहे.


 
 
 

Comments


bottom of page