top of page

उत्तर प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के; ५.२ रिश्टर स्केल तीव्रता

भूकंपाचा केंद्रबिंदू लखनऊपासून १३९ किमी अंतरावर


ree

उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि सीतापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. मध्यरात्री १.१६ च्या सुमारास जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केल इतकी होती. त्याचा केंद्रबिंदू लखनऊच्या १३९ किमी उत्तर-ईशान्य भागात ८२ किमी खोलीवर होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने यासंदर्भात माहिती दिली आहे. मात्र, या घटनेत अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

सुदैवाने अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाच्या धक्क्यामुळे झोपेत असलेले नागरिक खडबडून जागे झाले आणि त्यांनी घरा बाहेर पळत रस्त्यावर येऊन उभे राहिले. घरातील फ्रिजसह अनेक वस्तू जोरजोरात हालत होत्या, असे नागरिकांनी सांगितले. धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागरिक रात्री उशिरापर्यंत जागे होते. दरम्यान याआधी उत्तराखंडच्या पिथौरागढ भागातही ३.६ तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.


 
 
 

Comments


bottom of page