top of page

डोंबिवली स्टेशनजवळील तीन मजली इमारतीला भीषण आग

डोंबिवलीत रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या लक्ष्मी निवास या इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने अग्निशन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. दरम्यान इमारतीमधील रहिवासी तसंच दुकानातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

ree

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेत रेल्वे स्टेशनजवळ लक्ष्मी निवास नावाची तीन मजली इमारत आहे. या इमारतीत काही रहिवासी राहतात. तसेच काही कमर्शिअल कार्यालये आहेत. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लाकडांचं गोदाम आहे. या गोदामातच दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जवळपास तासाभराच्या आत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या आगीत गोदामातील लाकडे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत.


 
 
 

Comments


bottom of page