top of page

अभिमानास्पद... रणजितसिंह डिसले जागतिक बँकेच्या सल्लागारपदी

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची दखल पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. ही नेमणूक जून 2021 ते जून 2024 अशा तीन वर्षांच्या कालावधीसाठी असून शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. डिसले यांच्यावर सोलापूर जिल्ह्यासह, राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ree

जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम जागतिक बँकेने हाती घेण्यात आला आहे. जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील 12 व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे.

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर हा सात कोटींचा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना प्रदान करण्यात आला. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरल्याने त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा आहे.


 
 
 

Comments


bottom of page