top of page

तिरंदाजी वर्ल्ड कप: एकाच दिवसात दीपिका कुमारीने पटकावली ३ सुवर्ण पदकं

पॅरिसमध्ये सुरु असलेल्या तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी भारताच्या दीपिका कुमारीने एका दिवसात भारताला ३ सुवर्ण पदक मिळवून दिली. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत ४ सुवर्णपदके पटकावली आहेत.

ree

यापूर्वी भारतीय महिला रिकर्व्ह संघाने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कोमलिका बारी या तिघींनी मिळून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. या तिघींनी तिसऱ्या फेरीतील फायनलमध्ये मॅक्सिकोविरुद्ध सोनेरी कामगिरी केली होती.

कंपाउंड तिरंदाजी क्रीडा प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माने अमेरिकेच्या दिग्गज क्रिस शाफला शूटआफपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत पराभूत करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती.


विशेष म्हणजे नवरा-बायकोच्या जोडीने भारताला  तिसरे सुवर्ण मिळवून दिले. तिरंदाज अतनु दास आणि त्याची पत्नी दीपिका कुमारी या जोडीने फायनलमध्ये नेदरलंडच्या जेफ वान डेन बर्ग आणि गॅब्रिएला शोलेसर जोडीचा 5-3 असा पराभव केला. 

दिवसअखेर दीपिकाने वैयक्तिक स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले. यात तिने रशियाच्या एलेना ओसीपोव्हाचा 6-0 असा पराभव करत एकाच दिवसात तीन सुवर्ण पदके जिंकली.


 
 
 

Comments


bottom of page