top of page

भारतात सापडलं डायनासोरचं दुर्मिळ अंडं

भारतात डायनासोरची दुर्मिळ अंडी सापडली आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या संशोधकांनी डायनासोरचं दुर्मिळ अंडं शोधून काढले आहे. या अंड्याच्या आत एक अंडे देखील आहे. डायनासोरच्या अंड्याचा हा प्रकार बहुधा जीवाश्मांच्या इतिहासात पहिल्यांदाच सापडलाय. आतापर्यंत सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये 'अंड्यात अंडे ' अशी अंडी सापडलेली नाहीत. त्यामुळे ही फार दुर्मिळ अंडी असल्याचं संशोधकांचे म्हणणे आहे. जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्सच्या ताज्या अंकात हे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील बाग परिसरात शास्त्रज्ञांना असामान्य टायटॅनोसॉरिड डायनासोरची अंडी सापडली होती. बाग शहराजवळील एका गावात संशोधकांना मोठ्या संख्येने टायटॅनोसॉरिड सॉरोपॉडची घरटी सापडली. एका घरट्यात संशोधकांना 10 अंडी सापडली, त्यातील एक अंडं फारचं दुर्मिळ होते. या अंड्यात अंडे होते. या अंड्याला दोन गोलाकार कवच होते, दोन कवचांमध्ये अंतर होते. दरम्यान ही दुर्मिळ अंडी चर्चेचा विषय ठरली आहेत. या अंड्यातून नेमकं काय संशोधन समोर येते हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.


 
 
 

Comments


bottom of page