top of page

धुळ्यातील शंकर मार्केटमध्ये भीषण आग

धुळे : धुळे शहरातील पाचकंदील परिसरातील शंकर मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कापडांची दुकानं असल्यामुळे बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केलं. मार्केटमधील इतर दुकानंही आगीच्या भक्षस्थानी सापडली आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ree

मार्केटला लागल्या आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत होते. अरुंद जागा असल्यामुळे अग्निशमन दलाला अडचणी येत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


 
 
 

Comments


bottom of page