top of page

कंगना रणौतचा बहुचर्चित ‘धाकड’ पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप

अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘धाकड’ चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेरीस २० मेला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘धाकड’ देशभरात जवळपास २२०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. पहिल्या दिवशी या चित्रपटाची कमाई जवळपास १ कोटी २० लाख रुपये झाली.

ree

कंगनाच्या इतर चित्रपटांच्या तुलनेमध्ये या चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन फारच कमी होतं.कंगनाने ‘धाकड’ या चित्रपटाचं प्रमोशनही अगदी जीव ओतून केलं. जवळपास ८० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवली. याउलट ‘धाकड’ बरोबरच प्रदर्शित झालेल्या कार्तिक आर्यनच्या ‘भुल भुलैय्या २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार १३ कोटी २५ लाख रुपये कमाई केली. सध्यातरी ‘भुल भुलैय्या २’ चित्रपटापुढे ‘धाकड’ फ्लॉप ठरला असंच म्हणावं लागेल.


Comments


bottom of page