top of page

इतके लूज बॉल मला मिळत आहेत, की...

महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार सामना रंगला असताना देवेंद्र फडणवीस हे क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी करताना दिसले. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले असताना आज क्रिकेटच्या भाषेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. “क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचित करायचो. पण जेव्हा फिल्डींग करायचो, तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायचा नाही. पण आता माझं ठरलंय, मी वेगवान बॉलिंगही करणार आहे, गुगलीही करणार आहे आणि बॅटिंगला येईल, तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे”, असं म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.

ree

वडाळा विधानसभा मतदार संघात भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी फलंदाजीत हात आजमावला. एखादा बॉल हुकला, मात्र फडणवीसांनी बोलिंगवर जोरदार टोलेबाजी केली.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमाशी सवांद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, "क्रिकेट खेळताना मजा येते, त्यात बॅटिंग करायला आणखी मजा येते. मी बॉडीलाईन बोलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल ऑन द स्टम्प बोलिंग करतो आणि माझा शॉर्टपिचही बॉल नसतो. योग्य टाकत असतो.समोरच्यांना बॅटिंग करताना, तो बॉल खेळताना अडचण होते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ree

सध्याच्या परिस्थितीत इतके लूज बॉल मला मिळत आहेत, की ते बॉल मला सीमारेषेपार पाठवावेच लागतील. आणि बॉलिंगचं बोलायचं, तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल, ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. त्यामुळे मला वाटतं की समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

ree

दरम्यान, यावेळी बोलताना फडणवीस यांनी रश्मी शुक्ला प्रकरणावरून राज्य सरकारला सवाल केला आहे. “माझा सवाल आहे की चौकशी कुणाची करायला हवी? ज्यांनी चोरी पकडली त्यांची की ज्यांनी चोरी केली त्यांची? ज्यांनी चोरी केली त्यांना आम्ही मोकाट सोडू आणि का पकडलं याकरता आम्ही चौकशी करू हा या सरकारचा न्याय आहे. यातूनच हे सरकार कुणाला पाठिशी घालतंय हे स्पष्ट दिसतंय. असं देखील फडणवीस म्हणाले.

ree

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या “शरद पवारांनी UPA चं नेतृत्व करावं” या मागणीवर देखील त्यांनी टोला लगावला . “युपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय. त्याच्या म्हणण्यानुसार कोण कॅप्टन हे ठरत नसतं. त्यासाठी टीममध्ये असायला लागतं. टीमच्या बाहेरच्या माणसाने ते म्हणून काही फायदा नसतो”, असं ते म्हणाले.


 
 
 

Comments


bottom of page