top of page

नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही... शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत...

गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलच तापलेलं दिसत आहे. त्यात शिवसेना व राष्ट्रवादी यांनी देखील गोवा आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमधील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!” असं म्हणत टोला लगावला आहे.

ree

राष्ट्रवादी पक्ष गोव्यात टीएमसी, काँग्रेसला सोबत घेऊन सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपनं गोवा विधानसभा निवडणुकीची धुरा सोपवली आहे. भारतीय जनता पक्ष निश्चितच गोव्यात सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत गोव्याचे भाजपा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. राहिला प्रश्न अटीतटीच्या लढतीचा तर आम्ही कोणतीही निवडणूक हलकी समजत नाही. विरोधी पक्ष आपसातच स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकदा कोणासोबत लढत आहे हे जर निश्चित झालं तर त्यावर बोलता येईल.” असं देवेंद्र फडणवीसांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.


शरद पवारांचा पक्ष असा आहे की, पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा…, मग ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी तर कधी टीएमसीशी बोलतात. कारण ती काही राष्ट्रीय पार्टी नाही. त्यांचं काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, त्यांचे काही राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी नक्कीच असेल परंतु ती पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहे, थोडी महाराष्ट्राची पार्टी आहे. या पेक्षा ती मोठी पार्टी नाही.” असं ते म्हणाले.


 
 
 

Comments


bottom of page