top of page

मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे – देवेंद्र फडणवीस

मुंबई: “मला एकही दिवस जाणवलं नाही मी मुख्यमंत्री नाही, मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेलापुरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. त्यावरून आता उलट सुलट प्रतिक्रिया उमटत असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

ree

पुढे बोलताना ते म्हणाले, “आपल्या सगळ्या भगिनींना चांगल्या प्रकारचं वातावरण मिळावं. चांगल्या प्रकारच्या सोयी मिळाव्या, यासाठी अनेक योजना आपल्या काळामध्ये आपण राबवल्या आणि मला विश्वास आहे की, (भाजप आमदार मंदा म्हात्रे) ताईंच्या कामामुळे महिलांना मोठा फायदा होईल. नवी मुंबईमध्ये गणेश नाईक असतील किंवा ताई असतील, यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे या शहराचा विकास झाला. देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हे शहर नेहमी अग्रेसर राहिलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल. नवी मुंबईची सेवा करण्याकरिता आमच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये मंचावरील मंडळी कायम तयार असतील”, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


मला एकही दिवस जाणवलं नाही मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्री आहे. मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधी जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेते म्हणून मी उत्तम काम करत आहे, असे फडणवीस म्हणाले.


 
 
 

Comments


bottom of page