top of page

शरद पवार हे ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत... देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात...

गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य

ree

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ४ राज्यात विजय मिळविला आहे. या विजयानंतर मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. “शरद पवार हे ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाता कामा नये अशी त्यांची भूमिका आहे. पण देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात... ' अशी टीका पडळकर यांनी यावेळी केली. त्यामुळे पुन्हा एकदा पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत मुंबईत भाजपाकडून करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत थेट शरद पवारांवर निशाणा साधला. “शरद पवार हे ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाता कामा नये अशी त्यांची भूमिका आहे. पण देवेंद्र फडणवीस असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे. फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधातली भूमिका जी शरद पवारांकडे आहे तसले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आहे,” असंही गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.


 
 
 

Comments


bottom of page