top of page

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, लवकरच पुरावे देणार

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्यावर झालेल्या प्रत्येक आरोपाला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यासोबतच नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा धक्कादायक आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

ree

ते पुढे म्हणाले, नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. यासंदर्भातील पुरावे तुमच्या समोर मांडेन. तसेच शरद पवार यांच्याकडे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेले पुरावे पाठवणार आहे. आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे त्याला आता शेवटापर्यंत न्यावे लागेल.

नवाब मलिकांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की तो भाड्यानं आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.


 
 
 

Comments


bottom of page