top of page

डेंग्यू प्रतिबंधासाठी व्यापक प्रयत्न कराा; अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या सूचना

चंद्रपूर: पावसाळ्यानंतर डेंग्यूचा प्रभाव वाढतो. पावसाळ्यात आणि त्याच्या नंतरच्या महिन्यात म्हणजेच जुलै ते ऑक्टोबरमध्ये डेंग्यू सगळ्यात जास्त पसरतो. कारण या ऋतूमध्ये डासांची पैदास वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू तापावर प्रतिबंधासाठी व्यापक प्रयत्न करा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिल्या.

ree

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, स्वच्छता विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. अमोल शेळके यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी यावेळी डेंग्यू प्रतिबंधासाठी होत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. मागील महिनाभरापासून उपाययोजना म्हणून शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील प्रत्येक वॉर्डात दररोज डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात येत आहे. डेंग्यू आणि मलेरिया आजारापासून बचाव करण्यासाठी नागरिकांच्या घरी असलेल्या कूलरच्या टाक्यांमध्ये 'अबेट द्रावण' टाकण्यात येत आहे.


एडीस इजिप्ती डासाला खूप उंचावर उडता येत नाही आणि डेंग्यूचा मच्छर सकाळी चावतो. चावल्याच्या ३ ते ५ दिवसांनंतर रुग्णांमध्ये डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसण्यास सुरवात होते. शरीरात ही बाधा होण्यासाठी मर्यादा ३ ते १० दिवसांची पण असू शकते. त्यामुळे आतापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डेंग्यूचे मच्छर साचलेल्या पाण्यात होतात. म्हणुन घरात आणि आजुबाजूच्या परिसरात पाणी साचू देऊ नका, कूलरमध्ये असलेले पाणी २ ते ३ दिवसांमध्ये नक्की बदला, घराच्या आजूबाजूच्या नाल्यांमध्ये एंटी लार्वाचा फवारा मारा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
 
 

Comments


bottom of page