top of page

डेल्टा प्लस व्हेरिएंट : महाराष्ट्रासह ३ राज्यांना केंद्राचा इशारा!

कोरोना आणि म्युकरमायकोसिसपाठोपाठ देशात डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. देशात सध्या या विषाणूचे २२ रुग्ण आढळून आले आहेत. फारसे रुग्ण जरी नसले, तरी त्याची क्षमता आणि त्याच्या प्रसाराचा वेग पाहाता महाराष्ट्रासह ३ राज्यांना केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे.

ree

यामध्ये महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांचा समावेश आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाने या तीनही राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवून सतर्क केलं आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारतासह जगातल्या एकूण ८० देशांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट सापडला आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरिएंट आत्तापरर्यंत एकूण ९ देशांमध्ये आढळला आहे. भारतात डेल्टा प्लसचे एकूण २२ रुग्ण सापडले आहेत. या २२ रुग्णांपैकी पैकी १६ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगावमध्ये, केरळमधील पलक्कड आणि पथ्थनमथित्ता, मध्य प्रदेशमधील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यांमध्ये करोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे.


 
 
 

Comments


bottom of page