top of page

महाराष्ट्रात डेल्टा प्लस (Delta Plus) व्हेरियंटने घेतला पहिला बळी

मुंबई: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे डेल्टा प्लस व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंट संक्रमित २१ रुग्ण आहेत. आज डेल्टा प्लस व्हेरियंटने संक्रमित 80 वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ree

हा रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. डेल्टा प्लस विषाणूग्रस्त ८० वर्षाच्या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यादरम्यान तिचा मृत्यू झाला. याला आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दुजोरा दिला. डेल्टा प्लसने मृत्यू झालेल्या महिलेला इतर आजारही होते. यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.


रत्नागिरीमध्ये ९, जळगावमध्ये ७, मुंबईमध्ये २ तर पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येक १ डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांनी लस घेतली होती का? तसेच त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात असल्याचे टोपे यांनी सांगितले.



 
 
 

Comments


bottom of page