top of page

दिल्लीत हाय अलर्ट; सणासुदीला दहशतवादी हल्ल्याची शक्यता

नवी दिल्लीः देशाची राजधानी दिल्लीत पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून महत्त्वाच्या ठिकाणांवर गस्त घालण्यात येत आहे. तसंच ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे.

ree

गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर दिल्लीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी बाजारपेठांमध्ये सुरक्षा वाढवली आहे. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसवर लक्ष ठेवले जात आहे. दिल्लीत रहायला आलेले भाडेकरू आणि कामगारांच्या पडताळणीवरही भर दिला जात आहे.



 
 
 

Comments


bottom of page