top of page

दैनिक भास्कर समूहाच्या कार्यालयांवर ‘इन्कम टॅक्स विभागा’चे छापे

दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले असून कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे. कर चोरी प्रकरणात आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने भास्कर समूहाच्या कार्यालयांवर छापेमारी केली जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


 
 
 

Comments


bottom of page