top of page

"मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या मरू द्या...!'' पालकमंत्री दत्ता भरणेंचं वादग्रस्त वक्तव्य

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक ५ मधील देगाव रोड येथे 43 एकर जागेवर गटनेता आनंद चंदनशिवे यांच्या भांडवली निधीतून वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्‍तामामा भरणे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्रा दत्ता भरणे यांनी बोलायला सुरुवात केली. महापौरांशी बोलताना दत्ता भरणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरुन सोलापूर जिल्ह्यात एकच चर्चा सुरु झाली. त्यांच्या या वक्तव्याचे शिवसेनेतून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. सोलापूरचे शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुतरगावकर आणि संपर्कप्रमुख माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दत्तात्रय भरणे यांना इशारा दिलाय.

ree

दरम्यान, त्यानंतर पालकमंत्री दत्ता भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांविषयीचे विधान अवधानाने तोंडून निघाले, त्याचा विपर्यास करु नये असे सांगत मंत्री भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.


 
 
 

Comments


bottom of page