top of page

ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने २२ विद्यार्थी जखमी

ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने २० हुन अधीक विद्यार्थी जखमी झाले. अमरावती येथील दर्यापूर येथे ही घटना घडली असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ree

मिळालेल्या माहितीनुसार, जे.डी. पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर जैनपूर येथे सुरू होते. या शिबीराचा शुक्रवारी समारोप झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना चक्क एका ट्रॅक्टर ट्रॉलीत बसवून दर्यापूर येथे आणले जात हाेते. एका वळणावर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. या घटनेत २० हुन विद्यार्थी जखमी झालेत. तर काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमींना अमरावतीच्या पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


 
 
 

Comments


bottom of page