top of page

CWG 2022 Hockey : तब्ब्ल १६ वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघानं जिंकलं पदक

बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडचा २-१ असा पराभव करत कांस्यपदक पटकावले आहे. तब्बल १६ वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्यात यश आले आहे. यापृवी भारतानं २००२ मध्ये सुवर्ण आणि २००६ मध्ये रौप्यपदक जिंकले होते.

कांस्यपदकासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या ऑलिव्हिया मेरीने शेवटच्या क्षणी गोल करत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला. निर्धारित ६० मिनिटांपर्यंत दोन्ही संघांनी १-१ गोल केला होता. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा ३-० ने पराभव केला. मात्र यावेळी महिला संघाने कोणतीही चूक केली नाही. भारताच्या सविता पुनियाने शानदार गोलकीपिंग करताना न्यूझीलंडचे चार प्रयत्न हाणून पाडले.


 
 
 

Comments


bottom of page