top of page

CRPF जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर केला गोळीबार; ४ जवानांचा मृत्यू, ३ जखमी

सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील निमलष्करी दलाच्या कॅम्पमध्ये सोमवारी एका सीआरपीएफ (CRPF) जवानाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) चार जवानांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाली आहेत. राजधानी रायपूरपासून सुमारे 400 किमी अंतरावर असलेल्या जिल्ह्यातील लिंगमपल्ली गावात सीआरपीएफच्या 50 व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली,

ree

दरम्यान, जखमी जवानांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. जवानाने गोळीबार का केला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पण, सीआरपीएफकडून या घटनेची चौकशी केली जात आहे.


 
 
 

Comments


bottom of page