top of page

चक्क खासदाराच्याच घरात घुसून चोरीचा प्रयत्न; पण...

चोरट्यांनी चक्क खासदाराच्याच घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला. मात्र चोरांच्या हाती काहीही ऐवज लागला नाही. त्यामुळेच संतापलेल्या चोरांनी बंगल्यातील वस्तूंची नासधूस केली. चंद्रपूरमधील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी हा चोरीचा प्रयत्न झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलीय.

चंद्रपूर शहरातील सरकार नगर येथे असलेल्या खासदार बाळू धानोरकर यांच्या 'सूर्यकिरण' बंगल्यावर हा संपूर्ण प्रकार घडलाय. चोरीचा प्रयत्न करण्यापूर्वी चोरांनी घराची रेकी केली. घरी कोणी नसल्याचं पाहून चोरांनी मुख्य दाराचं कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. बंगल्यामधील सीसीटीव्हीच्या आधारे चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. या बंगल्यामध्ये कोणतेही मौल्यवान साहित्य नसल्याने चोरांनी बंगल्यात फार नासधूस केलीय. सूर्यकिरण याच बंगल्यात आधी धानोरकरांचं कार्यालयही होतं. मात्र आता त्यांचं कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलंय. राहण्यासाठी धनोरकर हाच बंगला वापरतात. त्यामुळेच घरी कोणी नसल्याचं पाहून चोरांनी हा डल्ला मारल्याचं स्पष्ट होत आहे.


 
 
 

Comments


bottom of page