top of page

पुणे-सोलापूर हायवेवर थरार; गोळीबार करत स्कॉर्पिओतील ३.६ कोटी लुटले

स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार करत दरोडेखोरांनी गाडीतील ३ कोटी ६० लाख २६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे-सोलापूर हायवेवर असलेल्या वरकुटे पाटी ( ता. इंदापूर) येथे मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. याप्रकरणी भावेशकुमार पटेल यांनी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

ree

भावेशकुमार पटेल ( सध्या रा. मुंबई ) हे मूळचे गुजरात येथील असून ते आपल्या स्कॉर्पिओ गाडीने गुरुवारी रात्री उशिरा सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने चालले होते. यादरम्यान इंदापूरजवळ मौजे वरकुटे पाटी गावच्या हद्दीमध्ये ४ जणांनी लोखंडी टॉमी दाखवत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु पटेल यांनी गाडी भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने नेली. दरोडेखोरांनी स्कार्पिओ गाडीचा पाठलाग सुरु केला. मात्र गाडी थांबवली जात नसल्याने दरोडेखोरांनी गाडीवर गोळीबार करत गाडी अडवली. गाडीमधील दोघांना मारहाण करत गाडीमधील ३ कोटी ६० लाख रुपये आणि भावेशकुमार पटेल यांच्या जवळील रोख रक्कम १४ हजार रूपये तसेच दोन व्हिओ कंपनीचे मोबाईल असा एकूण ३ कोटी ६० लाख २६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घेऊन फरार झाले. याप्रकरणी भावेशकुमार पटेल यांनी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केली आहेत.


 
 
 

Comments


bottom of page