top of page

… तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी (२ मे) जाहीर झाले. देशभरात पश्चिम बंगालमधील निकालाची चर्चा सुरू असून महाराष्ट्रातही निकालावरून सत्ताधारी पक्ष भाजपाला लक्ष्य करताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षांकडून होत असलेल्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत प्रत्युत्तर देत आव्हान दिले आहे.

ree

" महाराष्ट्रात माझे आव्हान आहे... कोणत्याही निवडणुकीत चारही पक्षांनी वेगवेगळे लढून पाहावे, मग सर्वांना कल्पना येईल की कोणाला किती बोलण्याची पात्रता आहे. तीनही पक्ष एकत्रित असून सुद्धा पंढरपुरात आमचा पराभव करू शकले नाहीत, मग हे वेगवेगळे लढले तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही."असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page