top of page

"अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाब..नाही तर...?"

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्वरित चौकशी करण्याची विनंती केली आहे.त्यासंबंधी उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र दिलं असून देशमुख यांनी "मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन " असं ट्विट केलं. यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका करत "अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव…नाही तर…??” असा सवाल उपस्थित केला आहे.

ree

“अनिल देशमुखांकडून २१ तारखेला पत्र लिहून घेतले गेले. ते ४ दिवस प्रलंबित ठेऊन २४ तारखेला प्रसिद्ध केले.१०० कोटींच्या वसुलीचे आरोप व पत्रात व्हाट्सअँप-एसएमएसची भाषा. पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न? अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव…नाही तर…??” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.


 
 
 

Comments


bottom of page