top of page

अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी, पुण्याचे ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक भाजपा नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असल्याचं म्हंटलं होतं . त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना चांगलाच टोला लगावला आहे. ते म्हणाले, "अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी, पुण्याचे ? कोरोनाकाळात ते नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्याला कधीही गेले नाहीत, बहुतेक त्यांना हे जिल्हेच माहिती नसावेत."

ree

आज सकाळी पुण्यातल्या मानाच्या कसबा गणपतीचं चंद्रकांत पाटील यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "मला माजी मंत्री म्हणू नका", असं वक्तव्य का केलं होतं याचा खुलासाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “सनसनाटी बातम्या निर्माण केल्याने काही होत नाही. २०-२२ महिने झाले, हे असंच चाललंय. आमच्या एकाही आमदाराला ते हात लावू शकले नाहीत. उलट आम्ही पंढरपूर जिंकलं आता आम्ही देगलूर जिंकण्याच्या दिशेने आहोत.


मला हे कळत नाही की अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-पुण्याचे? पूर्ण कोविड काळात ते नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्याला कधीही गेले नाहीत, बहुतेक त्यांना हे जिल्हेच माहिती नसावेत. त्यांनी काल घोषित केलं की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका माझ्या नेतृत्वाखाली…स्वतःला किती लहान करुन घेतलं”.


 
 
 

Comments


bottom of page