top of page

हे कधीपर्यंत असंच चालणार?

'महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी' या मथळ्याखाली २ मार्च ते १२ मार्चपर्यंत घडलेल्या महिला अत्याचाराच्या काही घटनांकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लक्ष वेधले असून हे कधीपर्यंत असंच चालणार? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

ree

"आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा राज्यात सुरु असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या तेव्हा १०-१२ दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पूजा चव्हाणसारख्या घटना स्मरणात आल्या. ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार? या सर्व गोष्टींची सरकार गंभीर दखल कधी घेणार? झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार ?" असं ट्विट करत त्यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत.

 
 
 

Comments


bottom of page