top of page

चिंताजनक : आज दिवसभरात राज्यात ५७ हजार ७४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, २२२ रूग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढतच चालली असून रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ५७ हजार ७४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून २७ हजार ५०८ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. २२२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

ree

राज्यात एकूण ४,३०,५०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८३.८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०५,४०,१११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,१०,५९७ (१४.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,०५,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,७११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


 
 
 

Comments


bottom of page