top of page

दिलासादायक! सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत मोठी घट

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग तिसऱ्या दिवशी मोठी घट पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात 1 लाख 65 हजार 553 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 3 हजार 460 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

तर 2 लाख 76 हजार 309 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आजपर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 21 कोटी 20 लाख 66 हजार 614 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ree

देशातील गेल्या 24 तासातील आकडेवारी

नवे रुग्ण – 1,65,553

डिस्चार्ज – 2,76,309

मृत्यू – 3,460


आजपर्यंतची आकडेवारी

एकूण रूग्ण – 2,78,94,800

एकूण डिस्चार्ज – 2,54,54,320

एकूण मृत्यू – 3,25,972

एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण – 21,14,508

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 21,20,66,614


 
 
 

Comments


bottom of page