top of page

देशभरात २४ तासात ३ लाख ३३ हजार ५३३ नवीन कोरोनाबाधित; ५२५ रूग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली - भारतात गेल्या २४ तासांत ५२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ३ लाख ३३ हजार ५३३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर २ लाख ५९ हजार १६८ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात २१ लाख ८७ हजार २०५ सक्रीय रुग्ण आहेत. तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १७.७८ टक्के इतका आहे.

दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रात ४६ हजार ३९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हजार ७९५ जणांनी कोरोनावर मात केली. तर ओमिक्रॉनचे ४१६ नवे रुग्ण राज्यात आढळून आले आहेत.


 
 
 

Comments


bottom of page