top of page

... आम्ही रुग्णांना मरण्यासाठी कसं काय सोडू शकतो?

कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा जाणवत आहे. लखनऊ आणि मेरठमध्ये ऑक्सिजनअभावी होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंबंधीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे . " विज्ञान इतकं प्रगत झालं आहे की, ह्रदय प्रत्यारोपण आणि ब्रेन सर्जरी होत आहेत. अशा परिस्थितीतही आम्ही लोकांना मरण्यासाठी कसं काय सोडू शकतो?," अशी विचारणा यावेळी न्यायालयाने केली. न्यायालयाने यावेळी लखनऊ आणि मेरठचे जिल्हा दंडाधिकारी यांना या वृत्तांसंबंधी चौकशी करत ४८ तासांत रिपोर्ट सादर करण्याचा आदेश दिला आहे.

ree

न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि अजित कुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु झाली. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू होणं आमच्यासाठी वेदनादायी आहे. वैद्यकीय ऑक्सिजनची खरेदी आणि पुरवठा साखळी सुनिश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्यांकडून करण्यात आलेलं हे गुन्हेगारी कृत्य असून नरसंहारापेक्षा कमी नाही,” अशा शब्दांत उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला.



 
 
 

Comments


bottom of page