top of page

मंत्री, माजी आमदारासह शेकडो लोकांना कोरोनाबाधिताने वाटला प्रसाद...

कोरोनाचं संकट पाहता अनेक राज्यांनी लॉकडाउनसारखा कठोर निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. मात्र काही जणांच्या निष्काळजीपणाचा फटका इतरांना बसत असल्याचं दिसत आहे. एका व्यक्तीची ३१ मे रोजी चाचणी करण्यात आली होती. त्यात त्याला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. याची जाणीव असूनसुद्धा तो पंजाबमधील संगरूर येथील गुरुद्वारामध्ये प्रसाद वाटण्यासाठी गेला. कोरोनाबाधित व्यक्तीने एक मंत्री आणि माजी आमदारासह शेकडो लोकांना प्रसाद वाटला. संबंधित व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समजल्यानंतर आरोग्य विभागाची झोप उडाली असून या घटनेनंतर गावातील ३० जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या करमजीत सिंह यांच्या शोकसभेसाठी लोकं एकत्र आले होते. त्यासाठी १ जूनला गुरुद्वारामध्ये प्रसाद वाटण्यात आला होता. कोरोनाबाधित व्यक्तीच्या हातून पंजाबचे शिक्षण मंत्री विजय सिंगला आणि संगरुरचे माजी आमदार प्रकाश चंद गर्ग यांनीही प्रसाद घेतला होता. या घटनेनंतर शिक्षणमंत्री विजय सिंगला यांनी गावातील लोकांची करोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहे.



 
 
 

Comments


bottom of page