top of page

सावधान ! एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद

गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद

ree

गेल्या २४ तासात ३२९३ रुग्णांचा मृत्यू झाला असून एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. मंगळवारी रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्यानंतर आज पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्या वाढली असून गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ जणांनी कोरोनावर मात केली.



 
 
 

Comments


bottom of page