top of page

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा; यंदाही गणेशोत्सव, दसरा-दिवाळी कोरोना नियमांसोबतच

देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरली नसल्याचं स्पष्ट करत सणासुदीच्या काळात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव, दसरा-दिवाळी कोरोना नियमांसोबत साजरी करावी लागणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली आहे.

ree

सणासुदीच्या काळात कोरोनाबधितांची संख्येत वाढ होताना दिसून येते. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणं गरजेचं आहे, असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

लसीकरणामुळे रोगाची तीव्रता कमी होते आणि रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती ओढावत नाही. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरी मास्क आणि कोरोना नियमावलीचं पालन करणं आवश्यक आहे”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.


केरळमधील कोरोना स्थितीवरही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.



 
 
 

Comments


bottom of page