top of page

देशातील कोरोनाबळींची संख्या तीन लाख पार

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग तिसऱ्या दिवशी घट झाली आहे. काल दिवसभरात 2 लाख 22 हजार 315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. काल 4 हजार 454 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाखांवर गेली आहे.

आजपर्यत देशभरातील 3 लाख 03 हजार 720 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात देशात 3 लाख 2 हजार 544 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तसेच आतापर्यंत देशातील 19 कोटी 60 लाख 51 हजार 962 नागरिकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


 
 
 

Comments


bottom of page