top of page

दिलासादायक : २ लाख १९ हजार ८३८ जणांनी केली कोरोनावर मात

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला असून देशात गेल्या २४ तासांत २,६२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३ लाख ४६ हजार ७८६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांचा हा जागतिक उच्चांक असून, परिस्थिती आणखीनच बिकट होत असल्याचं दिसत आहे.

ree

गेल्या २४ तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४६ हजार ७८६ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २ हजार ६२४ जणांचा मृत्यू झाला आहे. काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे २ लाख १९ हजार ८३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत १ लाख ८९ हजार ५४४ जणांचा मृत्यू झाला असून, देशात सध्या २५ लाख ५२ हजार ९४० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


 
 
 

Comments


bottom of page