top of page

कोरोनाचा कहर : गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक रुग्ण; जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या

भारतात कोरोनाचा कहर वाढत असून मागील २४ तासांत तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख १४ हजार ८३५ करोना रुग्ण आढळले असून २१०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. भारताच्या आधी अमेरिकेत एका दिवसात तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. २ जानेवारी २०२१ ला अमेरिकेत ३ लाख ३१० रुग्ण आढळले होते.

ree

भारतात सध्या रुग्णसंख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ५४ हजार ८८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत झालेल्या २१०४ मृत्यूनंतर एकूण मृतांची संख्या १ लाख ८४ हजार ६५७ वर पोहोचली आहे. देशात सध्याच्या घडीला २२ लाख ९१ हजार ४२८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशभरात १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ जणांचं लसीकरण झालं आहे.


 
 
 

Comments


bottom of page