top of page

Corona Update : देशात चार लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण; 3 हजार 523 जणांचा मृत्यू

दर1रोज दैनंदिन रुग्ण संख्येचा विक्रम होत असून देशात गेल्या 24 तासात चार लाखांपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडण्याचा विक्रम नोंद झाला आहे. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 लाख 01 हजार 993 नवे रुग्ण सापडले असून 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर गेली असून 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 रुग्ण कोरोना उपचारानंतर बरे झालेले आहेत, एकूण कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख 11 हजार 853 वर पोहचली आहे. देशात 32 लाख 68 हजार 710 सध्या सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

ree

महाराष्ट्रात काल (30 एप्रिल) रोजी 62,919 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 828 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. 69,710 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात सध्या 6,62,640 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 46,02,472 झाली असून 38,68,976 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

 
 
 

Comments


bottom of page