top of page

कोरोनाचा रुग्ण सापडला तर आजूबाजूची २० घरं होणार सील....

योगी सरकारचा निर्णय

ree

कोरोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लसीकरण वाढवण्यात आलं आहे. तसेच राज्य सरकारकडून लोकांच्या जनजागृतीचेही प्रयत्न सुरु आहेत. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने एक पाऊल पुढे टाकत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळेल त्याच्या आजूबाजूची २० घरं कंनटेनमेंट झोन म्हणून जाहीर करून ती सील केली जातील. तसेच या ठिकाणी १४ दिवसांसाठी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला जाता येणार नाही आणि तेथील कोणालाही बाहेर येता येणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव इतर लोकांना होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. एकापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास ६० घरं सील केली जातील.


इमारतींसाठी वेगळे नियम तयार करण्यात आले आहेत. एखाद्या इमारतीमध्ये एखाद्या मजल्यावर कोरोना रुग्ण आढळून आला तर संपूर्ण मजला सील केला जाईल. एखाद्या ठिकाणी एकाहून अधिक रुग्ण आढल्यास त्या इमारतीला कंटेनमेंट झोन जाहीर केलं जाईल. १४ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला नाही तर कंटेनमेंट झोनमधून या इमारतींचं नाव हटवलं जाईल.


उत्तर प्रदेशमध्ये मागील २४ तासांत कोरोनाचे ४ हजार १६४ नवे रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंत ८ हजार ८८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रविवारी ७८ हजार ९५९ नमुने आरटी पीसीआर चाचण्यांसाठी पाठवण्यात आले असल्याचे उत्तर प्रदेशचे अपर मुख्य सचिव (आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले.


 
 
 

Comments


bottom of page